गुढे.ता.भडगांव(वार्ताहर) – येथील जि.प.प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत नुकताच सेवापूर्ती व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती हेमलता पाटील होत्या.त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.यावेळी शाळेच्या वतीने शिक्षीका श्रीमती सिंधू गुलाबराव अंभोरे यांचे शाल,पुष्पगुच्छ,साडी व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.


येथील जि.प.प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षीका श्रीमती सिंधू गुलाबराव अंभोरे या आपल्या प्रदिर्घ सेवेतून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या त्यांचा शाळेच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ,साडी व भेटवस्तू देऊन पं.स.सभापती हेमलताताई पाटील यांच्याहस्ते निरोप देण्यात आला. याचबरोबर कन्या शाळा, भराडी वस्ती शाळा यांनी देखील भेटवस्तू देऊन सत्कार केला.तसेच येथून बदली झालेले शिक्षक कैलास पवार,प्रविण पाटील यांच्या देखील शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला.
निरोपार्थी सिंधू अंभोरे यांनी येथील कन्या शाळेत १०वर्षे सेवा केली असून शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांनी शाळेला डेसबोर्ड(संभाषण व्यासपीठ) व कार्यरत असलेल्या शाळेला पितळी समई भेट दिली.यावेळी मनोगत मुख्याध्यापक माधवराव देवरे,राजेंद्र सोनवणे,शिक्षक कैलास पवार,प्रविण पाटील,माधव वाघ, अरुणा बाविस्कर,नंदा पाटील यांनी व्यक्त केले.तसेच मँडमच्या कन्या रचना देशमुख यांनी आईच्या शिक्षकी सेवेचा कर्तृत्वाचा यशस्वी प्रवास सांगितला यानंतर निरोपार्थी सिंधू अंभोरे यांनी मनोगत व्यक्त करण्यापूर्वीच त्यांना अश्रु आवरणे कठीण झाले होते.कारण एक महिन्यापूर्वीच त्यांचे पती सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कै.आप्पासाहेब देशमुख यांचे निधन झाले होते.त्यांनी निरोप घेण्यास सहकाऱ्यांना नकार दिला होता पण सहकारी शिक्षकांनी मोठ्या आग्रह, विंनती करत त्यांना बोलवत छोटेखानी निरोप देण्याचे आश्वासन दिले होते.अंभोरे मँडम यांनी या दोन्ही शाळेत अतिशय चांगली सेवा दिली आहे यांचे स्मरण व आठवण आजही गावाला व पालकांना, विद्यार्थ्यांना देखील आहे.त्या एक हाडांच्या उपक्रमशील शिक्षीका होत्या प्रत्येक सेवेच्या गांवी त्यांनी विद्यार्थी,शाळेला न्याय दिला असल्याची आठवण त्यांच्या सहकारी शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षका,सत्यभामा पाटील,मनिषा पाटील,आरती अहिरे, शिक्षक विनोद पाटील,छगन पगारे,विलास मोरे, राकेश पाटील, सुदाम पाटील व राहुल देशमुख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रविणसिंग राजपूत यांनी मानले.







