विशेष संपादकीय
भगवान सोनार
संपादक केसरीराज

ज्या कंगनाला मुंबईमध्ये येण्याअगोदर कुणीच ओळखत नव्हतं त्याच मुंबईने कंगनाला नाव दिलं पैसा दिला प्रसिद्धीचे वलय दिले आता तीच कंगना कृतघ्नपणाची परिसीमा गाठून त्याच मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देत आहे. हे सगळे एकूण आम्हाला तर असेच वाटते आहे की, आपला घटनात्मक मत व्यक्त करण्याचा अधिकार वापरून बॉलीवूडमधील लोक नशा करतात असे आरोप करीत आहे परंतु आम्ही आमचा तर्काच्या कसोटीवर हे वाक्य तपासून पाहिले असता तर आमचा असाच निष्कर्ष निघतो आहे की, कंगनाच सर्वात मोठी नशे खोर आहे. ! नशेमध्येच तिने मुंबई हे फक्त पाकव्याप्त काश्मीर वाटते हे विधान केले असेल असे आम्हाला आमचा बौद्धिक तर्क सांगतो.कारण या मुंबईने अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, दिलीप कुमार, धर्मेंद्र, देवानंद या सार्यांचा जन्म महाराष्ट्र बाहेरचा आहे. परंतु यासह अनेक दिग्गजांची ओळख मुंबईने संपूर्ण भारतालाच काय जगाला करून दिली.
मुंबईच्या निर्मितीपासून आतापर्यंत मुंबई बद्दल असे विधान करण्याची कोणाचीच हिम्मत झाली नाही. कारण मुंबईने हा आपला तो परका असा भेदभाव कधीच केला नाही. प्रत्येकालाच तिने आपली मायेची उब मायेच्या कुशीत एका लहान मुलाप्रमाणे सामावून घेतले आहे आणि तीच मुंबईला कंगनाला पाकव्याप्त काश्मीर वाटते म्हणूनच आम्हाला असे वाटते कि, कारणाने हे वाक्य नशेमध्येच केले असावे !
कंगना तु जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तुझा चित्रपटातील अभिनय तुझा तो कमनीय बांधा तुझे ते कुरळे केस , तुझी ती घायाळ करणारी नजर हे सगळं बघून आमच्यासकट या महाराष्ट्रातील मुंबईतील लाखो तरुण तरुणी तुझ्या अभिनयाच्या, सौंदर्याच्या प्रेमात पडले असतील परंतु तुझ्या मुखधनुष्यातून निघालेल्या की मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटते या अतिविषारी बाणांनी आम्ही सगळेच जखमी झालो आहे.
त्या जखमांमधून भळा भळा रक्त वाहत आहे. पण कंगना आता तू सावध रहा त्या रक्ताचे ज्वालामुखीत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही म्हणून तू आता मुंबईत येऊ नकोस तू तुझ्या थंड हवेच्या हिमाचल प्रदेशातच रहा कारण तू मुंबईला आलीस तर तुला आमच्या उद्रेकाचा ज्वालामुखीचे चटके तुला सहन होणार नाही.कदाचित तुझे अस्तित्व त्या चटक्यांनी वितळून जाईल आणि तुझा डीएनए शोधण्यासाठी हाडाचा कणही मिळणार नाही म्हणून आमचा तुला सल्ला असेल की तू तुझ्या थंड हवेच्या ठिकाणी रहा आणि हो आमच्या संवेदनशील मनाला असाही प्रश्न पडतो की तुझा एक वेळा डीएनए चेक करूनच घेतला पाहिजे म्हणजे त्यामुळे एवढं तरी आम्हाला कळून चुकेल की तू खरोखरच भारतीय आहेस का ही देखील शंका आमच्या मनामध्ये येत आहे.?
कंगना तुला मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणताना तुझा जर भूगोलाचा अभ्यास असेल तर तुला हे माहित असले पाहिजे जगामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले आणि त्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं कोणतं शहर असेल तर ते एकमेव शहर म्हणजे मुंबई आहे. तरीही ते मुंबई 1993 मधले बॉम्ब हल्ले असोत की 2005चा जलप्रलय तरीही मुंबई कधी डगमगली नाही आणि डगमगणारही नाही कारण त्या मुंबईच्या संरक्षण आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या छातीवर गोळ्या घेणारे तुकाराम ओंबळे सारखे पोलीस करतात आणि त त्याच पोलिसांवर देखील तू अविश्वास दाखवित आहेत ज्या मुंबई पोलिसांची तुलाना स्कॉटलांड बरोबर होते ज्या पोलिसांनी या कोरोना महामारीच्या अग्निकुंडामध्ये आपल्या देहाचे दान दिले त्या पोलिसांवर तुझा विश्वास नाही. नशा करून करून तुझा मेंदू पडला आहे की, काय
कंगना एक वेळ तूच म्हणाली होतीस कि मला काम मिळवण्यासाठी माझं शारीरिक शोषण झालेलं आहे माझ्या मर्जीविरुद्ध माझ्याशी अत्याचार करण्यात आलेला आहे. या तुझ्याच वक्तव्यावरुन असे दिसते की खोट्या प्रतिष्ठेसाठी तू तुझं स्त्रीत्व गहाण ठेवणारी ललना आहेस आणि भारतीय संस्कृतीमध्ये अशा खोट्या प्रतिष्ठेसाठी आपले स्त्रीत्व बहाल करणार्या महिलेला समाजामध्ये कवडीचीही किंमत राहत नाही असे देखील भारतीय संस्कृती सांगते
तू तुझ्या स्त्रीत्वाचा त्याग तुझ्या परिवारासाठी तुझ्या समाजाच्या उत्कर्षासाठी केलेला नाही तर तुझ्या खोट्या प्रतिष्ठेसाठी तू ते बहाल केलेलं आहेस
आम्हाला तर तुझ्यापेक्षा मुंबईच्या कामाठीपुर्यातील महिला श्रेष्ठ वाटतात कारण ते खुल्या पणाने छातीठोकपणे सांगतात की, हो आम्ही आमच्यासाठी नव्हे तर आमच्या कुटुंबासाठी आमचे शरीर विकतो प्रतिष्ठेसाठी नाही हे बोलण्याची नैतिकता तरी त्या दाखवतात आणि तू तर तुझी मर्यादेची चौकटच हरवून बसली आहेस.
म्हणून शेवटी आम्ही तुला एवढेच सांगू इच्छितो ज्या मुंबईने तुला पद प्रतिष्ठा पैसा या सगळ्यांचं भरलं ताट वाढून दिलं होतं त्याच ताटात तू…… केलीस
परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. मोठ्या मनाने मुंबईची माफी माग मुंबई पोलीसांची माफी माग काही चुकलं त्यांना मोठ्या मनानं माफ करण्याची ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि बघ पुन्हा तीच मुंबई तुझ्या कुरळ्या केसांवरुन मायेचा हात फिरवून तुला जवळ घेऊन तुला आशीर्वाद देईल
पण कंगना पुन्हा मात्र तू तुझ्या मर्यादेचं कंगन ओलांडू नकोस हाच आमचा तुला सल्ला असेल







