कोरोनाचे संकट दूर करण्याचे बाप्पाला साकडे


कुडाळ – माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतू साकार झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे आज पावशी तलाव येथे थाटात पण कोरोनाचे नियम पाळून मोजक्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले. जगावर उदभवलेली कोरोनाची महामारी लवकरात लवकर दूर कर असे साकडे राजाच्या चरणी घालण्यात आले.









