बीड : कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीमध्ये कोरोणाचा रुग्ण आढळला आहे, व्हाट्सअपला स्टेटस ठेवणाऱ्या आणि पोस्ट व्हायरल करणारा अशा दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, दरम्यान, कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची खोटी माहिती दिली होती. पुण्याच्या विभागीय आयुक्तानी याबाबत पडताळणी केली. यावेळी ही माहिती खोटी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी खोटी माहिती देणाऱ्या एकावर कोरेगाव पार्क पोलीस स्टोशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे.