नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच धोनीपाठोपाठ भारतीय संघातील त्याचा सहकारी सुरैश रैना याने देखील निवृत्ती जाहीर केली आहे. रैनानेसुध्दा इस्टाग्रामव्दारे आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे.
रैनाने इस्टाग्रामवर धोनीला टॅग करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रैना म्हणतो की, तुझ्या सोबत खेळण्याचा आनंद काही निराळाच होता. निवृत्तीच्या तुझ्या या प्रवासात मी देखील सहभागी होत आहे. धन्यवाद इंडिया , जय हिंद!
भारतीय संघाकडून त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2018 मध्ये खेळला होता. दरम्यान, भारताकडून सुरेश रैनाने 226 एकदिवसीय, 78 टी-20 आणि 18 कसोटी सामने खेळले आहेत.
रैनाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,615 धावा आहेत. तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 36 विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं 18 कसोटी सामन्यांमध्ये 768 धावा आणि 13 विकेट्स आणि टी-20 सामन्यांमध्ये 1,605 धावा केल्या आहेत.