• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट


१० हजार लोकसंख्येच्या गावाला बँक सुविधेची प्रतीक्षा; शेतकरी, महिला, वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांना बँकिंग कामांसाठी किनगावची पायपीट

यावल ( प्रतिनिधी ) :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील नायगाव येथे सध्या एकही बँक शाखा कार्यरत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जवळपास दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात बँकेची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी, शेतमजूर, महिला, वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक व्यवहारांसाठी किनगाव येथे जावे लागत आहे. गेल्या १२ ते १५ वर्षांपासून ही समस्या कायम असून प्रशासनाने अद्याप यावर ठोस उपाययोजना केलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.काही वर्षांपूर्वी नायगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा कार्यरत होती. मात्र, काही कारणास्तव ही शाखा बंद करून किनगाव शाखेला वर्ग करण्यात आली. त्यानंतर नायगावमध्ये एकही बँक शाखा सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, गावातील नागरिकांना बँकेच्या प्रत्येक कामासाठी किनगाव येथे जावे लागत आहे.छोट्या-मोठ्या बँकिंग कामांसाठीही किनगावची पायपीट
बँकेतून पैसे काढणे, पैसे जमा करणे, पासबुक अपडेट करणे, आधार लिंकिंग, केवायसी, खातेविषयक कामे तसेच शासकीय योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी नागरिकांना किनगाव गाठावे लागते. अनेकदा बँकेत गर्दी असल्यास नागरिकांचा अर्धा किंवा पूर्ण दिवस खर्च होतो. त्यात प्रवासाचा खर्च आणि वेळही वाया जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेषतः संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तसेच पीएम किसान योजनेचे अनुदान घेणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेच्या कामासाठी सुमारे तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. वृद्ध महिला, दिव्यांग नागरिक आणि आजारी व्यक्तींना या प्रवासाचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा सर्वच ऋतूंमध्ये नागरिकांना बँकिंग कामांसाठी गावाबाहेर जावे लागत आहे.
दहा हजार लोकसंख्या, तरीही बँक शाखेचा अभाव!
नायगावची लोकसंख्या जवळपास दहा हजार असून ग्रामपंचायतीमध्ये १३ सदस्य आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात एकही बँक शाखा नसणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नायगावच्या तुलनेत लहान असलेल्या सावखेडा सीम येथे स्टेट बँकेची शाखा कार्यरत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे नायगावमध्येही बँक शाखा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नायगावचा प्रश्न चर्चेत
सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असून २१ जागांपैकी महाविकास आघाडीच्या १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित ९ जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष कोणताही असो, निवडणुकीतील उमेदवारांनी नायगावच्या बँक शाखेचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन नायगाव येथे पूर्ववत बँक शाखा सुरू करावी. तसेच राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा किंवा पर्यायी बँकिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दिव्यांग आघाडीचे जिल्हा पूर्व अध्यक्ष अरुण पाटील यांनी केली आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
गेल्या १२ ते १५ वर्षांपासून नायगावकरांना बँकिंग सुविधांसाठी गावाबाहेर जावे लागत आहे. डिजिटल बँकिंग आणि आर्थिक समावेशनाच्या काळात दहा हजार लोकसंख्येच्या गावात एकही बँक शाखा नसणे ही ग्रामस्थांसाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाने तातडीने लक्ष घालून नायगावकरांची ही वर्षानुवर्षांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


 

 

Tags: #yawal news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची हत्या; दोघांना अटक

Next Post

आदिवासी पाड्यांपर्यंत बससेवा सुरू करा; यावल आगाराकडे ग्रामस्थांची मागणी!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट

आदिवासी पाड्यांपर्यंत बससेवा सुरू करा; यावल आगाराकडे ग्रामस्थांची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट
खान्देश

आदिवासी पाड्यांपर्यंत बससेवा सुरू करा; यावल आगाराकडे ग्रामस्थांची मागणी!

November 23, 2026
नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट
खान्देश

नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट

November 23, 2026
शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची हत्या; दोघांना अटक
Uncategorized

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाची हत्या; दोघांना अटक

November 23, 2026
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

३० मीटर रिंग रोडची मूळ आखणी कायम ठेवा; अमोल पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा – अरविंद देशमुख

November 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट

आदिवासी पाड्यांपर्यंत बससेवा सुरू करा; यावल आगाराकडे ग्रामस्थांची मागणी!

November 23, 2026
नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट

नायगावमध्ये एकही बँक शाखा नाही! १५ वर्षांपासून ग्रामस्थांची फरफट

November 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon