• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरमध्ये खळबळ! साक्ष देण्याच्या वादातून वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाचा निर्घृण खून

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, डंपरचालक तात्काळ जेरबंद;

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 2, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेरमध्ये खळबळ! साक्ष देण्याच्या वादातून वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाचा  निर्घृण खून

अमळनेरमध्ये खळबळ! साक्ष देण्याच्या वादातून वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाचा निर्घृण खून

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, डंपरचालक तात्काळ जेरबंद

अमळनेर (विशेष प्रतिनिधी):
विरोधात साक्ष देण्याच्या जुन्या वादातून एका व्यक्तीला अत्यंत निर्मनुष्यपणे वाळूच्या डंपरखाली चिरडून ठार मारल्याची थरारक आणि संतापजनक घटना तालुक्यातील नांद्री बसस्थानकाजवळ ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. शरद रतन पाटील (रा. नगाव बुद्रुक) असे या दुर्दैवी मृताचे नाव आहे. या प्रकरणी विपुल गोसावी, मयूर बोरसे, सागर गोसावी आणि डंपरचालक भरत सुभाष पाटील यांच्यावर हत्येचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत डंपरचालकाला रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत.

नगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ते अंगणात दुचाकी लावत असताना वाळूचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी आलेल्या विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी आणि मयूर अनिल बोरसे यांच्या ट्रॅक्टरचा त्यांना धक्का लागला. यावरून जा विचारणा करण्यासाठी गेले असता, आरोपींनी ज्ञानेश्वर गोसावी व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी पंचनामा केला असता, त्यात शरद रतन पाटील हे मुख्य साक्षीदार होते. यामुळे संतापलेल्या विपुल गोसावी याने शरद पाटील यांना, “विरोधात साक्ष दिल्यास रस्त्यात चिरडून टाकेन,” अशी खुली धमकी दिली होती. ग्रामस्थांच्या मध्यस्थीमुळे त्यावेळी तक्रार टाळली गेली असली, तरी आरोपींनी आपला राग मनात ठेवला होता.

नांद्री बसस्थानकाजवळ गाठून रचला घात
३१ ऑक्टोबर रोजी रात्री पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पाटील व अन्य काही जण सावखेडा येथील देव हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास नांद्री बसस्थानकाजवळ पातोंड्याच्या दिशेने आलेल्या एका मारुती कारने महेश आत्माराम पाटील यांना जाणूनबुजून कट मारला. काही अंतरावर कार थांबल्यानंतर त्यातून विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी खाली उतरले. त्याचवेळी पातोंड्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरचा (क्र. HR 37 D 8957) चालक भरत सुभाष पाटील खाली उतरून अद्वातद्वा शिवीगाळ करू लागला. यावेळी प्रवीण गोसावी यांनी त्यांना हटकले असता प्रकरण अंगलट आले.

फिर्यादीनुसार, विपुल गोसावी याने डंपरचालक भरत पाटील याला सर्वांना चिरडण्याचे आदेश दिले. त्यानंतर चालकाने डंपर वेगाने त्यांच्या अंगावर नेला. यादरम्यान विपुल गोसावी आणि मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना चालत्या डंपरसमोर जोरात ढकलून दिले, तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केला. या भीषण हल्ल्यात शरद पाटील हे डंपरखाली आल्याने त्यांच्या दोन्ही पायांना व शरीराला गंभीर दुखापत झाली. यानंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी शरद पाटील यांना सुरुवातीला अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले आणि प्रकृती चिंताजनक असल्याने धुळ्याला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती समजताच आक्रमक झालेले आमदार अनिल पाटील यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली आणि उपचारांसाठी तातडीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षकांशी फोनवर चर्चा केल्याने संपूर्ण जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क झाली. दहिवद फाटा व पिंपळी मार्गे पळून जाणाऱ्या डंपरचा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून बुधगाव येथे तो पकडला आणि चालक भरत सुभाष पाटील यास रात्रीच जेरबंद केले. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट दिली असून, याप्रकरणी पुढील कठोर तपास अमळनेर पोलीस करत आहेत.


 

 

Previous Post

प्रा. आर. व्ही. पाटील यांचा सेवानिवृत्तीप्रित्यर्थ सन्मान

Next Post

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

चाळीसगावात शेतातील शेडमधून ८२ हजारांच्या १० शेळ्या-बकऱ्या चोरीला

November 2, 2026
भारतीय वायुसेनेत कार्यरत डॉ. मंगेश कुवर यांना पीएचडी
खान्देश

भारतीय वायुसेनेत कार्यरत डॉ. मंगेश कुवर यांना पीएचडी

November 2, 2026
असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची निवड
खान्देश

असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची निवड

November 2, 2026
 वरणगावजवळ तरुणावर गोळीबार; लोखंडी रॉडनेही हल्ला
क्राईम

 वरणगावजवळ तरुणावर गोळीबार; लोखंडी रॉडनेही हल्ला

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

चाळीसगावात शेतातील शेडमधून ८२ हजारांच्या १० शेळ्या-बकऱ्या चोरीला

November 2, 2026
भारतीय वायुसेनेत कार्यरत डॉ. मंगेश कुवर यांना पीएचडी

भारतीय वायुसेनेत कार्यरत डॉ. मंगेश कुवर यांना पीएचडी

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon