गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील प्रा. आर. व्ही. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा विभागाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यात आला.
प्रा. आर. व्ही. पाटील यांनी आपल्या सेवाकाळात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तसेच गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अध्यापनाप्रती असलेली निष्ठा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची तळमळ आणि सहकार्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी संस्थेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. कार्यक्रमाला गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, विभागातील प्राध्यापक डॉ. ईश्वर जाधव, डॉ. व्ही. डी. चौधरी, डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. हेमराज धांडे तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, संचालक डॉ. वैभव पाटील, संचालक डॉ. अनिकेत पाटील आणि संचालिका डॉ. अक्षदा पाटील यांनी प्रा. पाटील यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.









