पहूर ( प्रतिनिधी ) – भरधाव आणि निष्काळजी वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातात एका ३८ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वाकोद गावाजवळील पुलावर घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अभिलेखातील माहितीनुसार, अशोक पांडुरंग शेळके (वय ३८, रा. बाळसवाडा, ता. भोकरदन, जि. जालना) हे अपघातात गंभीर जखमी झाले होते. संबंधित वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.









