कारसह प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात; दोघांना अटक, एक आरोपी फरार

निंभोरा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध निंभोरा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ७ लाख ७० हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ५.४५ वाजता वडगाव फाट्याजवळ, ता. रावेर येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुदस्सिर कासिम (वय २३, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशीदजवळ, छत्रपती संभाजीनगर) हे एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर वाहन एमएच २६ व्ही ४४२३ मध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला.
जप्त मुद्देमाल कारवाईदरम्यान विमल गुटखा, प्रिमियम रजनीगंधा सुगंधित पान मसाला, प्रिमियम शॉट लखनवी चेविंग टोबॅको, बाबा १२० प्रिमियम चेविंग टोबॅको, बाबा १६० सॅफ्रॉन ब्लेंडेड लखनवी चेविंग टोबॅको आदी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच सिल्व्हर-गोल्ड रंगाची हुंडाई कंपनीची कार (क्र. एमएच २६ व्ही ४४२३) ताब्यात घेण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख ७० हजार ४४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाणे गु.र.नं. २११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा आयुक्तांच्या दि. १३ जुलै २०२६ रोजीच्या आदेशातील संबंधित तरतुदींनुसारही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ अजीम तैय्यब सय्यद व आरोपी क्रमांक २ शेख मुदस्सिर कासिम यांना दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.२० वाजता अटक करण्यात आली आहे. तर नितू शेठ नामक आरोपीचा शोध सुरू असून तो पाहिजे आरोपी असल्याचे नोंदीत नमूद आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असतानाही त्याची विक्री व वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.घटनेचा पुढील तपास मपोउनि अभय ढाकणे, निंभोरा पोलीस ठाणे करीत आहेत.