• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

विहिरीत सुमारे १५ मिनिटे लटकवून ठेवले; चापटांनी मारहाण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप

यावल (प्रतिनिधी) — यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून त्याची अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्या एका अनोळखी साथीदाराचाही शोध सुरू आहे.
याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ११०, १४०(३), ११५(२), ३५६(२), ३(५) तसेच दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा २०१६ मधील कलम ९२ अन्वये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील नामदेव रामदास पाटील (वय ५०, व्यवसाय शेती) यांनी फिर्याद दिली आहे. दहिगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर न्हावरा रोडलगत वेडू शंकर पाटील यांच्या मालकीच्या विहिरीजवळ २८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपी नितीन ऊर्फ मुन्ना सुनील पाटील (वय अंदाजे २३) आणि पंकज ऊर्फ झग्या संतोष पाटील (वय अंदाजे २२), दोघेही दहिगाव येथील रहिवासी, यांनी फिर्यादीचे दोन्ही पाय पकडून त्याला सुमारे १५ मिनिटे विहिरीत उलटे लटकवून ठेवले. त्यानंतर त्याची अंडरपँट काढून त्याला नग्न करून चापटांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपींच्या एका अनोळखी साथीदाराने विहिरीजवळ उभे राहून मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ तयार केला. फिर्यादीला विहिरीत लटकवून ठेवले असताना त्याचे पाय निसटले असते तर तो विहिरीत पडून जीव गमावू शकला असता, याची जाणीव आरोपींना असतानाही त्यांनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे, फिर्यादी दिव्यांग असल्याची माहिती आरोपींना असतानाही केवळ त्याची टिंगलटवाळी करण्यासाठी व त्यास घाबरविण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींनी केलेला व्हिडिओ व्हॉट्सॲपवर व्हायरल करून फिर्यादीची समाजात बदनामी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सपोनी अजयकुमार वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनेतील अनोळखी साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

Next Post

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!