डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.


यावेळी महात्मा गांधी यांच्या १०० व्या जयंतीला विवरे गावातून प्रभात फेरी काढल्याचे सांगत महात्मा गांधी यांच्या कार्याचे स्मरण केले. तसेच जय जवान जय किसान असा नारा देणारे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याची महती त्यांनी विशद केली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सींग सुप्रीटेंडंट संकेत पाटील, डेप्युटी सुप्रीटेंडंट मनिषा खरात, किर्ती पाटील, पूजा गांगरे, काजल, नूतन भाले, साक्षी पवार, नंदिनी ताले, ललित बोंडे, नरेंद्र नेमाडे, पंकज राणे, मिलींद पाटील, तुषार फेगडे, किशोर पाटील, अमोल बोंडे, नंदू शेळके, शशिकांत तायडे, गणेश तळेले, रितेश बोरोले, राजू राणे, नीलेश पाटील, राजेश पाटील यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे महात्मा गांधी यांची जयंती प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विजयकुमार पाटील, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
महाविद्यालयातील डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा, प्रा. अमित म्हसकर, प्रा. प्रवीण सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी गांधी जयंतीचे महत्त्व केवळ त्यांचा जन्मदिवसाचे स्मरण करण्यामध्येच नाही; तर त्यांचे नेतृत्व आणि सामाजिक न्याय व शांततेसाठी अतूट बांधिलकी ओळखण्यातही आहे. तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल मूर्ती लहान पण कीर्ती महान या वाक्याची प्रचिती देताना त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमीत्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दोन्ही महान राष्ट्रपुरुषांना आदरांजली वाहिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर व प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील लॉ अँड सायन्स कॉलेज
जळगाव : डॉ. उल्हास पाटील लॉ अँड सायन्स कॉलेज, जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवा या मूल्यांचे महत्त्व सांगण्यात आले.कार्यक्रमाला डॉ. नयना महाजन, महाजन सर, प्रा. अमोल चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









