
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित मुलगा आपल्या भावांसोबत कांग नदी परिसरात गेला होता. त्यावेळी संशयिताने मुलाला २० रुपयांचे आमिष दाखवून नदीजवळील झाडीमध्ये नेले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर संशयिताने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी जामनेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४(२), ६, ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंके करीत आहेत. संशयिताला अद्याप अटक झाली नसल्याची नोंद पोलिसांच्या प्राथमिक माहितीत आहे.









