• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

जळगाव  ( प्रतिनिधी ) – स्नेहल प्रतिष्ठान या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून पारंपरिक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, ‘॥ पिंप्राळ्याचा राजा ॥’ म्हणून जळगाव शहरात या मंडळाची ओळख आहे. जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला पिंप्राळा उपनगराशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणून स्नेहल प्रतिष्ठानकडे पाहिले जाते. अजिंक्य कमलाकर देसाई स्थापनेपासून या मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

केळीच्या खोडापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

समाजप्रबोधनासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे भान जपत मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या केळीच्या खोडापासून ‘पिंप्राळ्याचा राजा’ची मूर्ती साकारली आहे. ठाकूर ब्रदर्स यांच्या हस्ते ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

विसर्जनानंतर ही मूर्ती साधारण १२ ते १८ तासांत पाण्यात पूर्णपणे विरघळते. मूर्ती विरघळल्यानंतर त्यातील घटक माशांसाठी खाद्यरूपात उपलब्ध होत असल्याने पाण्याचे प्रदूषण टाळण्यास मदत होते. श्रींच्या मूर्तीचे विसर्जन भावभक्तीने आणि सनातन परंपरेनुसार व्हावे, तसेच विसर्जनानंतर मूर्तीची अवहेलना होऊ नये आणि निसर्गालाही कोणतीही हानी पोहोचू नये, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांवर आगमन आणि विसर्जन मिरवणूक

स्नेहल प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘पिंप्राळ्याचा राजा’चा आगमन सोहळा आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणूक आयोजित केली जाते. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत भजनांच्या तालावर जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच महिलांना नेतृत्वाच्या संधी देण्यात येत असल्याने गणेशोत्सव आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग असतो.

२५ वर्षांपासून समाजप्रबोधन आणि सामाजिक उपक्रम

गेल्या २५ वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान समाजप्रबोधनात्मक कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वारकरी संप्रदायातील नामवंत ७७ कीर्तनकारांची कीर्तने या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत. तसेच कीर्तन महोत्सवादरम्यान सेवा देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी सहकार्य केले जाते.

प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून नेत्रतपासणी शिबिरे, चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. हिवाळ्यात ब्लँकेटचे तर दिवाळीच्या काळात गरजूंना फराळ आणि मिठाईचे वाटपही करण्यात येते.

याशिवाय जळगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही स्नेहल प्रतिष्ठानचा सातत्याने सहभाग राहिला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवातही भक्ती, परंपरा, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

Next Post

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली
क्राईम

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा
क्राईम

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!
जैन कंपनी

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 8, 2026
साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!
खान्देश

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon