• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

जळगाव  ( प्रतिनिधी ) –गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालया, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीचा गौरव करण्यासाठी वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, क्रीडा विभागाचे क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. जयंत जाधव, क्रीडा संचालक, यांनी डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी आंतरमहाविद्यालयीन, आंतरविभागीय, विद्यापीठ, राज्य तसेच आंतर-झोनल स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे डॉ. जयंत जाधव यांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि अथक परिश्रम यांचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील विजेत्या व मानांकित संघांचा गौरव :
२०२५–२६ च्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत महिला खो-खो संघाने विजेतेपद पटकावले. तसेच पुरुष खो-खो संघानेही विजेतेपद मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. महिला व्हॉलीबॉल संघाने तृतीय क्रमांक, तर पुरुष व्हॉलीबॉल संघानेही तृतीय क्रमांक मिळवला. यासोबतच महिला तायक्वांदो, महिला कराटे आणि महिला वुशू या खेळांमध्येही विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. या सर्व विजेत्या व मानांकित खेळाडूंचा प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यापीठ व राज्यस्तरीय उल्लेखनीय कामगिरी :
अंतिम वर्ष AI & DS ची विद्यार्थिनी कु. पूर्वा चौधरी हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरेचे प्रतिनिधित्व करत All India University Level Taekwondo Competition मध्ये ५२ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

मोहम्मद झेनुद्दीन देशमुख यांनी DBATU हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करत West Zone University Level Hockey Competition, L.N.C.P. University, भोपाळ, मध्य प्रदेश येथे सहभाग नोंदवला.

अंतिम वर्ष E&TC ची विद्यार्थिनी साक्षी उबाळे हिने DBATU महिला खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करत Ashwamedh Sports Competition, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सहभाग घेतला.

द्वितीय वर्ष Electrical Engineering चा विद्यार्थी मंथन चौधरी याने DBATU पुरुष खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करत State-Level Ashwamedh Sports Competition, SRTMU नांदेड येथे सहभाग घेतला.

तृतीय वर्ष AI & DS ची विद्यार्थिनी काजल सोनवणे हिने DBATU कराटे संघाचे प्रतिनिधित्व करत South-East Zone University Level Karate Competition, Sanjeev Agarwal Global Education University, भोपाळ, मध्य प्रदेश येथे सहभाग नोंदवला.

अंतिम वर्ष Computer Engineering चा विद्यार्थी दिव्यांशु येशी याची जळगाव संघासाठी 61st Men’s-Women’s State Championship and Selection Test Kho-Kho Competition, बीड येथे निवड झाली. या सर्व खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात आला.

आंतर-झोनल स्पर्धेतील खेळाडूंचा गौरव :
आंतर-झोनल स्तरावर विविध क्रीडा प्रकारांमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचाही या समारंभात गौरव करण्यात आला.

खो-खो – Samarth Institute of Pharmacy, Belhe, Taluka Junnar:

तेजस पाटील, चेतन पाटील, साहिल सुरवाडे, दिव्यांशु येशी, मंथन चौधरी, गणेश जोशी, साक्षी उबाळे, सायली पाटील,वैष्णवी साबळे, भूमिका महाजन, उर्वली चौधरी आणि साक्षी पाटील या खेळाडूंनी खो-खोमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

कबड्डी – Yashoda Technical Campus, Faculty of Pharmacy, Satara:

मयूर कोळी, हर्षदा वारुळे, कोमल पाटील, दीक्षा पाटील आणि पूर्वा चौधरी यांनी कबड्डीमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

क्रिकेट – R.C. Patel Institute of Pharmacy, Shirpur, Dhule:

द्वितीय वर्ष AI & DS चा तुषार पाटील याने क्रिकेटमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

फुटबॉल – Sanjeevani Engineering and Technology Institute, Kolhapur:

शेख मोहम्मद शेख इस्माईल आणि संजोग लहासे यांनी फुटबॉलमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

व्हॉलीबॉल – Yashoda Technical Campus, Faculty of Pharmacy, Satara:

धनंजय खैरनार, स्नेहल पाटील, मयंक भुळे आणि शिवगंगा चिकाटे यांनी व्हॉलीबॉलमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

या सर्व खेळाडूंच्या मेहनतीचे, जिद्दीचे, शिस्तीचे आणि क्रीडाभावनेचे उपस्थितांनी कौतुक केले. मैदानावर मिळणारे यश हे केवळ पदक किंवा पारितोषिकापुरते मर्यादित नसून त्यामागे असलेला नियमित सराव, वेळेचे नियोजन, शारीरिक मेहनत, आत्मविश्वास, संघभावना आणि अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची जिद्द यांचे ते फलित असते. या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

याप्रसंगी डॉ. विजयकुमार पाटील, प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडेला महत्त्व द्यावे, असे आवाहन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रशिक्षण, प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे यावेळी कौतुक करण्यात आले. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देणारे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, क्रीडा विभाग, विद्यार्थी स्वयंसेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार मानण्यात आले.

“मेहनत, शिस्त, जिद्द आणि संघभावना यांच्या जोरावरच विजयाची खरी सुरुवात होते,” हा संदेश देत समारंभाचा समारोप करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भविष्यातही क्रीडा क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ.वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon