• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पीडित कुटुंबांना भरपाई व कायदेशीर मदतीसाठी नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख

जळगाव (प्रतिनिधी) – महामार्ग व बायपासवरील अपूर्ण कामे तसेच सुरक्षा त्रुटींमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना, गंभीर गुन्हा दाखल होऊनही संबंधितांना अटक न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग दुर्घटनेतील दोषींना त्वरित अटक करून पीडित कुटुंबांना योग्य भरपाई आणि कायदेशीर मदत द्यावी, अशी आग्रही मागणी जळगाव महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागांना सविस्तर पत्र सादर केले आहे. निष्पाप नागरिकांचा जीव गेलेला असताना आरोपी कितीही प्रभावशाली असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा इशारा देत नगरसेवक देशमुख यांनी नमूद केले की, पाचही मृत नागरिकांच्या कायदेशीर वारसांच्या स्वतंत्र फिर्यादी अद्याप नोंदविल्या गेलेल्या नाहीत. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना न्याय आणि भरपाई मिळेपर्यंत ही कारवाई थांबवू नये.

नुकसानभरपाई व सुरक्षा उपायांच्या संदर्भात त्यांनी प्रशासनासमोर प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये अपघातग्रस्त कुटुंबांसाठी नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी स्वतंत्र प्रकरण तयार करावे, संबंधित कंत्राटदार कंपनीची कायदेशीर व आर्थिक जबाबदारी ठरवून भरपाईची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, तसेच विमा दाव्यांसाठी लागणारे आवश्यक वैद्यकीय अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, पंचनामा व एफआयआर यांसारखे कागदपत्रे प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावेत, या बाबींचा समावेश आहे.

याशिवाय, पीडित कुटुंबांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेशीर साहाय्य मिळावे, जखमींची स्वतंत्र यादी करून त्यांना उपचार खर्च व विमा लाभ मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे व त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत रस्ता सुरक्षा परीक्षण (Road Safety Audit) करण्यात यावे.

दरम्यान, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, कंत्राटदार कंपनी, विमा कंपनी आणि पीडित प्रतिनिधींची तात्काळ संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी करत या प्रकरणात झालेल्या तपास, अटक व सुरक्षा उपाययोजनांची सविस्तर लेखी माहिती देण्याची विनंतीही नगरसेवक अरविंद देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुंबई प्रादेशिक अधिकारी, जळगावचे प्रकल्प संचालक, मनपा आयुक्त आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांना पाठवण्यात आल्या आहेत.


 

 

Tags: #jalgaon #jamner bjp #girish mahajan #arvind deshmukh #maharashtra #bharat
Previous Post

१५ वर्षातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे उद्या आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
1xbet russia

पीडित कुटुंबांना भरपाई व कायदेशीर मदतीसाठी नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे मागणी

September 5, 2026
वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जैन कंपनी

१५ वर्षातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे उद्या आयोजन

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!
जैन कंपनी

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!
जैन कंपनी

शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख

पीडित कुटुंबांना भरपाई व कायदेशीर मदतीसाठी नगरसेवक अरविंद देशमुख यांची प्रशासनाकडे मागणी

September 5, 2026
वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

१५ वर्षातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे उद्या आयोजन

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon