जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा वर्षाखालील खेळाडूंसाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन उद्या शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कांताई सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे. स्पर्धेसाठी ०१/०१/२०११ नंतर जन्मलेले खेळाडू पात्र राहतील.
स्पर्धेतील पहिल्या चार मुले व चार मुलींची निवड सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येईल.
तसेच वयोगट ९,११,१३ पहिल्या तीन खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात येईल.
स्पर्धेसाठी खेळाडूंनी आपली नावे कांताई सभागृह येथे परेश देशपांडे प्रवीण ठाकरे यांच्याकडे नोंदवावी.
स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.










