प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यावर गंभीर आरोप, अधिष्ठात्यांच्या कारभारावर नातेवाईकांचा तीव्र संताप !
चौकशी समितीने दिलेला अहवाल चुकीचा असून, काही शिक्षकांकडूनही सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप या विद्यार्थ्याने केला आहे. अंतिम वर्षात असताना आता परीक्षेसाठी मानसिक चाचणी करण्यास सांगितले जात असल्याने, अधिष्ठाता व प्रशासनाच्या या दबावशाही कारभाराविरुद्ध विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विद्यार्थ्याने थेट नाव घेतलेल्या संबंधित शिक्षकांवर आणि प्रशासनावर आता तरी कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दुसऱ्या बाजूला, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बाविस्कर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महसूल व पोलिस प्रतिनिधी असलेल्या समितीने चौकशी केली असून तक्रारीत कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे प्रशासनाकडून डॉ.योगिता बावस्कर यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित विद्यार्थ्यानेच इतर सहध्यायींना मारहाण केल्याच्या तक्रारी आहेत. तसेच एका विद्यार्थिनीनेही त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे डॉ.योगिता बावस्कर यांनी स्पष्ट केले आहे.








