• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळगाव हरेश्वर, धरणगाव आणि पाचोरा पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अवैध वाळू ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळगाव हरेश्वर, धरणगाव आणि पाचोरा पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अवैध वाळू ताब्यात

जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, पिंपळगाव हरेश्वर, धरणगाव आणि पाचोरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या प्रकरणांत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू असा एकूण मोठ्या किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पिंपळगाव हरेश्वरमध्ये ४ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४८ (७), ४८ (८) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागवी, ता. पाचोरा परिसरात १६ ऑगस्टच्या रात्री सुमारे ११ वाजता चोरीची वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉली आणि सुमारे ८ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ४ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप अटकेत नसल्याची नोंद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शांतिलाल पगारे करीत आहेत.

धरणगावात डंपरमधून वाळू चोरी

धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९०/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाळधी-शिवारा परिसरातील अर्ध्या पेट्रोलपंपाजवळ १७ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी विनापरवाना शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने वाळू चोरी करून डंपरमधून वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात अंदाजे ५ हजार ७२६ रुपये किमतीची वाळू चोरीस गेल्याची नोंद आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार सुनील लोहार करीत आहेत.

पाचोरा तालुक्यात ६ लाख ६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४८ (७), ४८ (८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडगाव नंदीचे गावातील बसस्टँड परिसरात १७ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. यावेळी स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा विनानंबर ट्रॅक्टर, लाल रंगाची ट्रॉली आणि शासकीय वाळू असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कासम वजीर तडवी (२२, रा. परधाडे, ता. पाचोरा), कल्पेश भास्कर ठाकरे (२२, रा. सांगवी, ता. पाचोरा) आणि जाबीर बुधा तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून विनापरवाना गौण खनिजाची चोरी करून वाहतूक केल्याचा आरोप आहे.

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची नजर

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने पोलीस आणि महसूल विभागाकडून कारवाया वाढविण्यात आल्या आहेत. पिंपळगाव हरेश्वर, धरणगाव आणि पाचोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon