धरणगाव तालुक्यातील रेंल येथून दारूच्या नशेत २६ वर्षीय तरुण बेपत्ता; पाळधी पोलिसांत नोंद
धरणगाव (विशेष प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील रेंल या गावातून दारूच्या नशेत एक २६ वर्षीय तरुण कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने बेपत्ता झाला आहे. भावड्या भगवत भिल्ल (वय २६, रा. माणिक बाग, एकलव्य नगर, जामनेर, ता. जामनेर) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास रेंल गावात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भावड्या भिल्ल हा ६ ऑगस्ट रोजी रात्री रेंल येथे आला असताना दारूच्या नशेत कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. नातेवाईकांनी त्यांचा आजपावेतो सर्वत्र शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाहीत.


बेपत्ता तरुणाचे वर्णन: उंची ५ फूट ३ इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, चेहरा लांबट असून डोक्याला रुमाल बांधतो. भाषा मराठी, तावडी व भिल्लाऊ बोलतो. अंगात राखाडी (ग्रे) रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पँट परिधान केलेली आहे.
या प्रकरणी ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाळधी दूरक्षेत्र (धरणगाव पोलीस ठाणे) येथे मिसिंग नोंद (क्र. ३८/२०२६) दाखल करण्यात आली आहे. पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









