जळगावात दिव्यांग व वृद्धांना मोफत साहित्य वाटप
तीन दिवसीय शिबिरात ९४० लाभार्थ्यांची तपासणी; जयपूर फुटसह विविध साहित्याचे वितरण


जळगाव : शहरातील लाड वंजारी मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे दिव्यांग व वृद्धांसाठी आयोजित तीन दिवसीय मोफत साहित्य वाटप व तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. दि. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान झालेल्या या शिबिरात तब्बल ९४० लाभार्थ्यांना तपासणीनंतर विविध प्रकारचे साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
दिव्यांगांसाठी विविध साहित्याचे वाटप
आचार्य श्री हिराचंद्रजी महाराजसाहेब, भावी आचार्य परमश्रद्धेय महेंद्रचंद्रजी महाराजसाहेब व श्री प्रमोद मुनी यांच्या प्रेरणेने तसेच श्रीमती सुदादेवी हिरावत आणि कै. श्री टिकमचंदजी हिरावत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, जयपूर यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात दिव्यांगांना जयपूर फुट, पांढरी काठी, कॉलीपर, कृत्रिम हात, तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, वॉकर व कुबड्या, तर दिव्यांग व वृद्धांना कानाचे मशीन व काठ्या आदी साहित्य तपासणीनंतर मोफत देण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पद्मश्री पुरस्कारविजेते व जयपूर समितीचे चेअरमन डी. आर. मेहता, शिबिरासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या श्रीमती नीताजी डागा, राजीवजी डागा, माजी आमदार मनीषदादा जैन, सुशीलजी बाफना, महावीर बोथरा, अनिल बोथरा, सुनील बाफना, श्रीमती तारादेवी बाफना, सुदादेवी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळगावकर आणि माजी उपमहापौर करीम सालार** यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी पद्मश्री डी. आर. मेहता तसेच प्रमुख अतिथी माजी आमदार मनीषदादा जैन यांनी उपस्थित दिव्यांग व वृद्धांना मार्गदर्शन केले.
आयोजकांचे परिश्रम
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन रत्न हितैषी श्रावक संघ व युवक परिषद तसेच शिबिर समितीचे प्रमुख राजेश सांखला, विमल संघवी व राजेंद्र कोळी यांनी परिश्रम घेतले.









