जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा


जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

यावल : यावल तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी ओम मनोजकुमार पाटील याने देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या जेईई अ‍ॅडव्हॉन्स २०२६ परीक्षेत ऑल इंडिया रँक ६४० मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या उत्कृष्ट यशाच्या बळावर त्याने देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी कानपूर येथे प्रवेश निश्चित केला आहे. ओम हा आयटी अभियंता उज्वला व मनोज अरुण पाटील यांचा मुलगा तर निवृत्त केंद्रप्रमुख अरुण रघुनाथ पाटील यांचा नातू तसेच डॉ. प्रशांत अरुण पाटील यांचा पुतण्या आहे. कुटुंबातील शैक्षणिक व संस्कारमूल्यांचा वारसा जपत ओमने कठोर परिश्रम, चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.जेईई अ‍ॅडव्हॉन्स ही परीक्षा देशातील सर्वाधिक कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात; मात्र मोजक्याच विद्यार्थ्यांना आयआयटी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. अशा परिस्थितीत ऑल इंडिया रँक ६४० हा क्रमांक मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.ओमच्या या यशामुळे त्याचे कुटुंब, शिक्षक, मित्रपरिवार तसेच यावल तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यशाबद्दल बोलताना ओमने आपल्या पालकांचे, आजोबा-आजींचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष आभार मानले. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यामुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील यश संपादन करून ओमने अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशामुळे यावल तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक आणखी उंचावला असून भविष्यात तो अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रात मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


 

 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!