जळगाव – गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या तथा भाजपच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये डॉ. केतकी पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. केतकी पाटील यांचे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे औक्षण करून स्वागत करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी डॉ. केतकी पाटील यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. डॉ. केतकी पाटील सभागृहात वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला चेअरमन तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधीष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. विद्यानंद आठवले, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, गोदावरी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश तायडे, पूनमचंद सपकाळे, आयुर्वेद महाविद्यालयाचे रजीस्ट्रार चेतन चौधरी, शिक्षण व संशोधन संचालक अशोक चौधरी,लेखापाल योगेश पाटील, सुनिल बोंडे, विकास बेंडाळे, किशोर झांबरे यांच्यासह रूग्णालयातील डॉक्टर्स, परिचारीका व कर्मचारी वृंद उपस्थित होते. याप्रसंगी वाढदिवसानिमित्त डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी मनोगत व्यक्त करीत डॉ. केतकी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी एकल गीत सादर केले. तसेच डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकल यांनी ड्युएट गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. प्राची यांनी केले. तर आभार कु. किवा पाटील हिने मानले. कार्यक्रमानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचार्यांनी डॉ. केतकी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समुह नृत्य, एकल नृत्य, गीत गायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी केलेल्या बहारदार नृत्याचे मान्यवरांनी कौतुक केले. गोदावरी एक संस्कार अन् विचार – डॉ. केतकी पाटील हा पहिला वाढदिवस आहे, ज्याला गोदावरी आजी नाही. गोदावरी हे केवळ एक नाव नसून तो एक संस्कार अन् विचार असल्याचे मत डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले. गोदावरी हेल्थ सिटी अंतर्गत ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांनी भविष्य घडवितांना विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. एक ट्रेंड म्हणून निर्णय घेऊ नका. सकारात्मक राहून नवा ट्रेंड तयार करा. पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञानही जोपासा. आपण एका नोबेल पेशात काम करतो. त्याला अनुसरून गोदावरी आजीचे संस्कार आणि विचार समाजापर्यंत पोहोचवा असे आवाहन डॉ. केतकी पाटील यांनी केले. डॉ. केतकी हे गोदावरीचे उज्वल भविष्य- डॉ. उल्हास पाटील गोदावरी अंतर्गत उभ्या राहिलेल्या संस्थांच्या मागे गोदावरी आई आणि मोठे भाऊ सुभाषदादा यांचे आशीर्वाद आहे. आता जेन-झी सध्या चर्चेत आहे. त्यामुळे नेतृत्व हस्तांतरीत करण्याची वेळ आली आहे. डॉ. केतकीचे भविष्य उज्वल असून ती मागे वळून पाहणार नाही असा विश्वास व्यक्त करीत तू मेरी जिंदगी है हे गीत चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सादर केले.











