• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

राजकीय वर्तुळात खळबळ ;अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दोन गुन्हे, न्यायालयात हजर करण्याची शक्यता

नंदुरबार: संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय वसंत चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने धुळे येथून ताब्यात घेतले आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा गंभीर आरोप असलेल्या या प्रकरणात चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गेल्या महिनाभरापासून विजय चौधरी यांच्या मोबाईलवरील कथित संभाषणांच्या अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या होत्या. यातील एका क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत अत्यंत जातीवाचक आणि शिवराळ भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रोहन शरद गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचबरोबर नंदुरबार शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेनेही दुसऱ्या एका कथित ऑडिओ क्लिपच्या संदर्भात विजय चौधरी यांच्याविरोधात स्वतंत्र तक्रार दिली होती. त्यावरूनही दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हे नोंदवल्यानंतर संशयित आरोपी विजय चौधरी जिल्ह्याबाहेर पसार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास धुळे-चाळीसगाव मार्गावर विजय चौधरी त्यांच्या खासगी वाहनाने प्रवास करत असताना, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तातडीने नंदुरबार येथे आणण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून औपचारिक अटकेची प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलिसांकडून विजय चौधरी यांना आज ७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या धडक कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांच्या हाती आणखी कोणते धक्कादायक तपशील लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जळगाव शहरातील डॉक्टरांच्या घरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

Next Post

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार
1xbet russia

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!