शिरसोली (प्रतिनिधी):- बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, सेवा केंद्र, जळगाव यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रम कार्यक्रमात तेजल दिदी आणि मेघा दिदी यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यसनांचे दुष्परिणाम, निरोगी व व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व तसेच समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र आंबटकर, प्रभारी पर्यवेक्षक श्री सुनील भदाणे, उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी, व कर्मचाऱ्यांनी नशामुक्त भारत घडविण्याची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. समाजात जनजागृती करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









