शिरसोली, ता. जळगाव (प्रतिनिधी):- सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव व राष्ट्रीय हरित सेना, बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरासह गावातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आंबटकर, प्रभारी पर्यवेक्षक श्री. सुनील भदाणे, शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज बारी, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय, जळगाव येथील तेजल दिदी व मेघा दिदी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाचे नियोजन व आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री. चंद्रकांत कुमावत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. जी. बी. काळे, श्री. एस. के. काटोले, श्री. डी. जी. कुलकर्णी, श्री. बी. आर. बारी तसेच श्री. पी. एम. पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले.










