अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

जळगाव : वार्ड क्र. ७ मधील शिवकॉलनी परिसरातील गणपती मंदिराजवळ अंडरग्राउंड ड्रेनेजची गंभीर समस्या निर्माण झाली असून ड्रेनेजचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याने अनेकजण घसरून पडत आहेत. एका अपघातात एका व्यक्तीला तब्बल १२ टाके पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. तरीही संबंधित प्रशासनाकडून या समस्येची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत नगरसेविका सौ. अंकिता पंकज पाटील आणि नगरसेवक विशाल भोळे यांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी करून अंडरग्राउंड ड्रेनेजची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
नगरसेविका सौ. अंकिता पंकज पाटील, नगरसेवक विशाल भोळे, समाजसेवक चेतन तिवारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ ड्रेनेज दुरुस्ती व रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.








