यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल | प्रतिनिधी : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम शिलदार भिल (वय ५८, रा. किनगाव खुर्द, ता. यावल, जि. जळगाव) यांनी राहत्या घराचा दरवाजा बंद करून घरातील छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५१/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप विघ्नल सूर्यवंशी करीत आहे.









