पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ

नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल
नशिराबाद | प्रतिनिधी : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता साईनगर परिसरात ही घटना घडली. सरकारी कामकाज सुरू असताना हाकीम याकूब पटेल (वय ३८, रा. जळगाव) याने पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली तसेच शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गुलाब खडके (वय ४३, नेमणूक – नशिराबाद पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी रजेवर तसेच प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे फिर्याद नोंदविण्यास विलंब झाला. दि. २६ जुलै २०२६ रोजी गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहे.
जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील, असा निर्धार जिल्हा पोलिसांनी व्यक्त केला आहे.









