जळगाव ( प्रतिनिधी ) – रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टँडवर प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका रिक्षाचालकावर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आल्याची घटना २२ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

या घटनेत सिद्धार्थ पंडित सोनवणे (रा. गोकुळ नगरी, पिंप्राळा) हे गंभीर जखमी झाले. डोक्यावर व मांडीवर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शरद कंडारे (रा. शिवाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









