जळगाव, ( प्रतिनिधी ) – .संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात मा नामदार गुलाबरावजी पाटील स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ३७ वर्ष सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला सदर प्रसंगी बोलताना मा नामदार गुलाबरावजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.


सर्व जाती धर्माच्या व सर्व वर्गाची सेवा एस टी महामंडळाचे कर्मचारी करीत असतात एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवन वाहिनी नव्हे तर रक्तवाहिनी आहे गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस टी ही संकल्पना जरी शासनाने राबवली तरी ती प्रत्यक्षात एस टी कर्मचार्यांमुळे शक्य झालेली आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत एस टी चा सिंहाचा वाटा आहे त्याबरोबर कर्मचार्यांचे वाटा आहे अशा या एस टी महामंडळाची ३७ वर्षे प्रदीर्घ सेवा करून आपले नियोजित कर्तव्य सांभाळून कामगारांची सेवा केली त्याबद्दल त्यांनी आर के पाटील यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले मा नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आर के पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास खासदार स्मिताताई वाघ माजी परिवहन मंत्री डॉ सतीश पाटील माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत जी सोनवणे जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश जी भोळे उर्फ राजू मामा जळगाव शहराच्या महापौर दीपमालाजी काळे पाचोर्याचे आमदार किशोर आप्पा पाटील मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे माजी उप महाव्यवस्थापक सोपानराव नाबदे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरणजी बिडवे संघटक सचिव सुभाष जाधव सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख सुरेशजी चांगरे व गोपाल पाटील विनोद शितोळे प्रशांत मोरे सागर निकुंभ खुशाल मोरे शैलेश नन्नवरे व एस टी महामंडळ जळगाव विभागातील सर्व सन्माननीय अधिकारी उपस्थित होते मोठ्या संख्येने आजी माजी कर्मचारी यांनीआर के पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस टी महामंडळातील सर्व युनियन पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन डि बी महाजन यांनी केले









