• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खवशीतील वादाचे हिंसक रूपांतर; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

चाकूहल्ला, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या; गावात तणावाचे वातावरण

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खवशी गावात जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत महिलांसह अनेक जण जखमी झाले असून एका बाजूने ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तर दुसऱ्या बाजूने प्राणघातक हल्ला, मारहाण व धमकावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी दिवसभरात झालेल्या किरकोळ वादातून हा संघर्ष उफाळून आला. रात्री सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन्ही गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

पहिल्या फिर्यादीनुसार, एका गटाने घरासमोर जमाव जमवून महिलांना जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर सुलभा पवार यांना मारहाण करून खाली पाडण्यात आले, तर शालूबाई पवार यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. फिर्यादी महिलाही बचाव करत असताना त्यांच्या हातावर चाकूचा वार झाल्याने त्या जखमी झाल्या. मदतीला धावून आलेल्या प्रतीक पवार यांनाही काही जणांनी पकडून ठेवत लोखंडी फाईटर व काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच नामनिर्देशित आरोपींसह २० ते ३० अनोळखी व्यक्तींविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, दुसऱ्या गटातील अल्पवयीन दर्शन गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळाच आरोप करण्यात आला आहे. सकाळी झालेल्या वादाबाबत चर्चा करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या वडिलांना लाकडाने मारहाण करण्यात आली, तर दर्शन यांच्या डोक्यात वीट व लोखंडी सळईने प्रहार करून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. हस्तक्षेप करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

अमळनेर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे.

खवशी गावातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

स्विफ्ट कारच्या धडकेत तिघे जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

Next Post

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon