जळगाव,(जिमाका) – शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह शासकीय यंत्रणेकडून त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था करण्यात येते.


मात्र, सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
[5:11 PM, 6/8/2026] चेतन दादा: अंतुर्ली (मुक्ताईनगर) येथे मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी…
मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे स्थानिक भाजप पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याबाबत विमा कंपनी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीची माहिती तात्काळ द्यावी असे आव्हान करण्यात आले.









