• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

जळगाव, (प्रतिनिधी):  भविष्यातील कृषी क्षेत्रात नेतृत्व विकसित करण्याच्या मुख्य उद्देशाने स्थापलेल्या  ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) अधिवेशनाचा आज समारोप झाला. १ ते ८ जून दरम्यान जैन हिल्स येथे तीन टप्प्यात झालेल्या या अधिवेशनात एकूण १६३ कृषी इन्व्होशन आणि १६३ कृषी बिझनेस प्लॅन विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. तिसऱ्या सत्रातील इन्व्होशनमध्ये सीताबाई पटवर्धन हायस्कूल (कुरुंदवाड, कोल्हापूर) आणि बिझनेस प्लॅनमध्ये अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव ) या शाळांना प्रथम क्रमांक मिळाला. ८ आणि ९ च्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० पेक्षा जास्त शाळांचा समावेश आहे. या उपक्रमाला जैन इरिगेशनचे सहकार्य लाभले आहे.

तिसऱ्या सत्राच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. समारोप भाषणात बोलताना जैन इरिगेशनचे अभिजित जोशी यांनी आपले अनुभव सांगताना सांगितले की, मी जैन इरिगेशनमध्ये रुजू झाल्यानंतर भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांनी लायब्ररीत पुस्तके लावण्यास सांगितले. त्यावेळी मोठ्याभाऊंनी आपल्या यशाचे रहस्य सांगताना, “मी चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं कधीच हातातून जाऊ देत नाही,” हा जीवनमंत्र मला दिला. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी आपल्या भाषणात फालीचा विकासाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी शार्बोनी पोद्दार यांची ओळख करुन दिली.

जळगावच्या अनुभूती स्कूलला दोन पारितोषिक
फालीच्या तिसऱ्या सत्रात जळगावच्या अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलला दोन पारितोषिक मिळवली. इन्व्होशनमध्ये अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नेक्सो बायोपल्गला तिसरा तर बिझनेस प्लॅनमध्ये कार्बोक्रेड कार्बन क्रेडीट अँण्ड सस्टेनबेल अ‍ॅग्रीकल्चर प्लॅटफॉर्मला पहिले पारितोषिक मिळाले.
फालीच्या तिसऱ्या सत्रात पारितोषिक विजेत्या शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यात- कृषी इन्व्होशन सादरीकरण – प्रथम- सीताबाई पटवर्धन हायस्कूल (कुरुंदवाड, कोल्हापूर), द्वितीय- सरस्वती साधना विद्या मंदिर, शांतीवन (आर्वी, बीड), तिसरा- अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव ), चौथा- महाराजा सयाजीराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (सातारा), पाचवा- अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (सातारा) तर
कृषी बिझनेस प्लॅन – प्रथम-अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव ), द्वितीय-सीताबाई पटवर्धन हायस्कूल  (कुरुंदवाड, कोल्हापूर ), तिसरा- एम जी शहा विद्यामंदिर (बाहुबली, कोल्हापूर), चौथा- दानोळी हायस्कूल (दानोळी, कोल्हापूर), पाचवा- महाराजा सयाजीराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (सातारा) या शाळांना गौरविले गेले.

फालीचे विद्यार्थी त्रिलोक चौधरी (देवास), श्रावणी अडसरे (नाशिक), प्रिया जरांगे (बीड), सार्थक येवले (पुणे) यांनी या उपक्रमातून काय शिकण्यास मिळाले, त्याबद्दल आपले अनुभव सांगितले. तसेच फालीच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यात प्रतिक्षा नांगरे आणि हर्षवर्धन खिल्लारे यांचा समावेश आहे. विनोद चौधरी (गोदरेज अ‍ॅग्रोवेट), अंकीत लढ्ढा (यूपीएल), शुभेंदू दास (आयटीसी), दुर्गेश गोयल (स्टार मॅग्री), मुक्तार आलम (एसबीआय फाउंडेशन),  विभाकर (रॅलीज इंडिया), प्रकाश मकवाना (प्रॉम्ट), मिहीर पटेल (अमूल) या कंपनी प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले. फालीच्या या उपक्रमास जैन इरिगेशनसह गोदरेज अ‍ॅग्रोवेट, युपीएल, स्टार अ‍ॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल, उज्जीवन, रयत शिक्षण संस्था आणि गांधी रिसर्च फाउंडेशन या कंपन्यांचे सहकार्य लाभते.


 

 

Tags: https://kesariraj.com/fali-adhiveshnaca-samarop/
Previous Post

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

Next Post

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या
1xbet russia

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

September 11, 2026
मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात
1xbet russia

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

September 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

September 11, 2026
मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon