जळगाव (प्रतिनिधी):- राज्यस्तरीय अंतरजिल्हा 15 वर्षीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड घोषित करण्यात आली असून, निवड झालेल्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्पर्धा शिरपूर येथील मिलिटरी स्कूलमध्ये होणार असून, जळगाव जिल्ह्याचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव यांनी संघाची अधिकृत घोषणा केली. यावेळी संघटनेचे सचिव फारुख शेख यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. .
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष इम्तियाज शेख, मनोज सुरवाडे, संचालक ताहेर शेख, थॉमस डिसोजा , नितीन डेव्हिड तसेच प्रशिक्षक तौसीफ खान यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









