वडिलांसोबतच्या वादातून घडली दुर्दैवी घटना; उपचारादरम्यान १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील निमड्या गावात कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर झालेल्या झटापटीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी इंदौर येथे दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव रमेश कैलास पावरा (वय १९, रा. निमड्या, ता. रावेर) असे आहे. तर या प्रकरणात कैलास रूपसिंग पावरा (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरासमोर अंगणात ही घटना घडली. आरोपी आणि मृत रमेश यांच्यात बाहेरगावी कामाला जाऊन कमावलेल्या पैशांच्या हिशेबावरून वाद सुरू झाला. दारूच्या नशेत दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी रमेश याने हातात दांडा घेत आरोपीकडे धाव घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दांडा हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात दोघांमध्ये झटापट झाली. याच वेळी आरोपीच्या हातून दांडा रमेशच्या डोक्याला जोरात लागला. गंभीर जखमी झालेल्या रमेशला उपचारासाठी इंदौर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर रमेशची आई गेंदा कैलास पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउनि मनोज महाजन करत असून, घटनेमुळे निमड्या गावात हळहळ व्यक्त होत आहे.