जळगाव शहर व जिल्ह्यातील गुडघेदुखी आणि खुबेदुखीच्या रुग्णांसाठी पुण्यातील प्रसिद्ध ‘लोकमान्य हॉस्पिटल्स’तर्फे एका विशेष सुपरस्पेशालिटी ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे शनिवारी, १६ मे रोजी जळगावमध्ये रुग्णांना मार्गदर्शन व उपचार करणार आहेत.


आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे सांधेदुखी आणि गुडघ्यांचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यावर आधुनिक उपाय शोधणाऱ्या रुग्णांसाठी ही ओपीडी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूक सांधेरोपण केले जाते. या ओपीडीमध्ये प्रामुख्याने गुडघेदुखी, खुब्याचे विकार, गादी फाटणे, पायाला बाक येणे, पाठदुखी व कंबरदुखी, तसेच खेळात होणाऱ्या दुखापती (लिगामेंट इंज्युरी) यांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होणार आहे.
दिनांक: शनिवार, १६ मे २०२६
वेळ: सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत
स्थळ: अरूश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव. ही ओपीडी जळगावातच होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज उरणार नाही. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी रुग्णांनी ९६७३८५९१८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटल्स, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.









