भुसावळ ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील अंडर-१६ मुलींच्या फुटबॉल संघाने ‘खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावत कास्यपदकावर नाव कोरले आहे.
ही स्पर्धा जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील संघांच्या सहभागात भुसावळच्या विद्यार्थिनींनी दमदार खेळ करत आपली छाप पाडली.संघाच्या या यशामागे खेळाडूंची जिद्द, एकजूट आणि उत्कृष्ट क्रीडाभावना यांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण स्पर्धेत संघाने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली.या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी संघाचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.