९० हजारांची चोरी
जामनेर (प्रतिनिधी):- जामनेर बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उषाबाई विठ्ठल पाटील (वय ६०, रा. मेणगाव, ता. जामनेर) ह्या २१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १:३० ते २ वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानक परिसरातून जात होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत मोठ्या शिताफीने लंपास केली.
उषाबाई यांनी २९ एप्रिल रोजी जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ९०,००० रुपयेची मणिपोत होती. या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्गदर्शक सपोनि स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू भोई करीत आहेत. बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.









