चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातीला वाल्मिकी नगर परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उमर खान उस्मान खान (वय ६३, रा. वाल्मिकी नगर, घाट रोड) हे २६ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ दरम्यान घराबाहेर असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष केले. चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
२९ एप्रिल रोजी दुपारी ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
चोरट्यांनी कपाटातील विविध वस्तूंवर डल्ला मारला आहे. एकूण मुद्देमाल: २,४८,००० रुपयेचा लंपास केला आहे. या घटनेची नोंद चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









