जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय (GCOE), जळगाव येथील विद्यार्थ्यांनी AICTE व Ministry of Education’s Innovation Cell (MIC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “Innovation, Design and Entrepreneurship (IDE) Bootcamp – Edition 3 Phase II” मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक (1st Rank) प्राप्त करून पारितोषिक पटकावले.

हा बूटकॅम्प दिनांक 20 एप्रिल ते 24 एप्रिल 2026 दरम्यान माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (MITS), ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे पार पडला. या उपक्रमामध्ये देशभरातील निवडक विद्यार्थ्यांना नवोपक्रम, डिझाईन आणि उद्योजकता क्षेत्रात कौशल्य विकसित करण्याची संधी देण्यात आली.
या बूटकॅम्पमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय वर्ष संगणक विभागाचे राज सुनिल सूर्यवंशी, विवेक चंद्रकांत ठाकूर, निशात किरण पाटील आणि कृष्णा ठोंबरे यांचा समावेश होता.
या विद्यार्थ्यांना प्रा. कल्पेश वाणी, प्रा. किरण बाविस्कर आणि प्रा. राजनंदिनी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप आयडियावर काम करून त्याचे प्रभावी सादरीकरण केले.
या बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना आयडिया व्हॅलिडेशन, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, प्रॉडक्ट डिझाईन, फायनान्शियल लिटरसी तसेच पिचिंग स्किल्स याबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन मिळाले. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली.
या बूटकॅम्पमध्ये एकूण 44 संघ सहभागी झाले होते. त्यामधून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाची टॉप 5 मधून उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे प्रथम क्रमांक (1st Rank) प्राप्त करून पारितोषिक पटकावले. ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
या यशामुळे विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर उद्योजकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील (IIC अध्यक्ष), डॉ. हेमंत इंगळे (IIC उपाध्यक्ष), डॉ. अतुल बराठे (IIC समन्वयक), शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांचे सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले. तसेच विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









