• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

दुसरा संघ आज ठरणार.. ओम भोसलेची १७० धावांची स्फोटक खेळी ठरली व्यर्थ

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटच्या रविवारी होणाऱ्या ग्रॅण्ड फायनल साठी पहिल्या क्वालिफायर मधून विजयी होत जळगाव कोगटा किंग च्या २४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटस ने थाटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा सुरू असलेल्या एलिमिनेटर सामन्यातून दुसरा क्वालिफायर साठी संघ ठरेल. दुसरी क्वालिफायर उद्या दि. २५ एप्रिल दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस या  भव्य क्रीडांगणावर होईल.
अमळनेर सुहांस जायंटस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जळगाव कोगटा किंग्स संघाच्या फलंदाजीनी हा निर्णय पूर्णपणे फोल ठरविला. ओम भोसले याने सुरवातीच्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत १० उत्तुंग षटकार व १७ चौकारांच्या मदतीने ७४ चेंडूंमध्ये १७० धावांची नाबाद स्फोटक खेळी खेळली.  त्याच्यासोबत अक्षय मेघानी  २१ धावा (१६ चेंडू), जितेंद्र नाईक २० धावा (१५ चेंडू), बिपिन चांगरे १३ धावा (११ चेंडू), पुर्वेश चौधरी ८ धावा (नाबाद) यांनी योगदान दिले. निर्धारीत २० षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात २४२ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला.  शुभम शर्मा च्या अचूक थ्रो ने जितेंद्र नाईक याला धावचीत केले. अमळनेर सुहांस जायंट संघातील केशव ठाकूर या गोलदांजाने ४ षटकांमध्ये दोन बळी घेतले. त्याच्या व्यतिरीक्त सर्व गोलंदाजांची पिटाई झाली.
धारदार प्रतिकार करत अमळनेर सुहांस जायंटसच्या फलंदाजांनी केवळ १८.३ षटकांत ३ गडी गमावत २४६ धावा करुन विशाल लक्ष्य गाठले.  रिषी यादव २६ (१७ चेंडू), मानव ट्रिबरेवाल २९ चेंडू ६ षटकार व ४ चौकारच्या मदतीने ६४ धावा करत विजयाचा पाया रचला. त्यावर रणजीत निकम व कर्णधार शुभम शर्मा यांच्या तेजतर्रार महत्त्वपूर्ण भागीदारीने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकम ने २८ चेंडूत ५ षटकार व ७ चौकार लगावत ७६ धावा केल्यात. तर शुभम शर्मा ने आक्रमक खेळी करत ३ षटकार ७ चौकार खेचून केवळ ३० चेंडूत ६५ धावा केल्यात. जळगाव कोगटा किंग्स चे कर्णधार जगदीश झोपे ने २ गडी बाद केले तर ३ षटकांत ५२ धावा देत राज बेलदारने १ गडी बाद केला. रणजीत निकम याला सामनावीर म्हणून पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी नितीन रेदासनी, जितेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थीत होते.

पाचोरा एसकेटी योद्धाजचा पराभव..
जळगाव क्रिकेट लिग चा १५ व्या लीग मधील अंतीम सामना हा दि.२३ च्या रात्री खेळविण्यात आला. अमळनेर सुहांस जायंट्सने दमदार फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर पाचोरा एसकेटी योद्धाजचा पराभव केला. ६७ धावांनी मिळालेल्या विजयामुळे गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांक अमळनेर सुहांस जायंट्स पोहचला. शुभम शर्मा व अजय पाटील यांच्या  तुफान खेळीने भक्कम पाया रचला. कर्णधार शुभम शर्मा याने ५१ चेंडूत ६९ धावा केल्यात, तर अजय पाटीलने ३५ चेंडूत ६९ धावा करून गोलंदाजांचे पिसे काढले. अमळनेर सुहांस जायंट्स चे १९६ धावांचे आव्हान पाचोरा एसकेटी योद्धाज चा संघ पेलवू शकला नाही.  सिद्धेश देशमुख (२५) व सचिन चौधरी (२४) यांनी थोडा प्रतिकार केला, मात्र बाकीच्या फलंदाजांना अमळनेर जायंट्सच्या गोलंदाजांच्या समोर नांगी टाकली.  संपूर्ण संघ १९.४ षटकांत १२९ धावांवर गारद झाला. अमळनेर सुहांस जायंट्सच्या सतिश चतुर्वेदीने अवघे १८ धावा देत ४ महत्त्वपूर्ण बळी घेऊन पाचोरा एसकेटीज योद्धाज च्या संघाला खिंडार पाडली. मोहम्मद सैफने ३ बळी, तर गौरव ठाकूर, शुभम शर्मा, केशव ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी बाद केले. नाणेफेक वेळी यश सुनील मंत्री, सामना अधिकारी विनीत कुलकर्णी उपस्थित होते. सामानवीर म्हणून शुभम शर्मा याला  गौरविण्यात आले. पारितोषीक वितरणाप्रसंगी अचीवर क्लासेसचे सचिन पटेल, प्रमोद चान्सरकर, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, श्री. काबरा अॅड. सुरज जहाँगीर उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – षटकार खेचताना अमळनेर सुहांस जायंटस चा  फलंदाज रणजीत निकम


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtra
Previous Post

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

Next Post

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर 'सर्जिकल स्ट्राईक'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !
1xbet russia

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
1xbet russia

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon