• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

स्थानिक गुन्हे शाखेची चालत्या रेल्वेत फिल्मी स्टाईल कारवाई

चोपडा प्रतिनिधी):- शहरातील धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ झालेल्या प्रदीप राजेंद्र महाजन माळी यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. मुंबईला पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३ वर्षे, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा दि. १९ एप्रिल रोजी रात्री ९ ते २० एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास चेहरा आणि डोके अज्ञात हत्याराने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) हे तात्काळ फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ते मुंबईला गेल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी दादर येथून रेल्वेने पुन्हा जळगावकडे येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसून शोध सुरू केला आणि नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

संशयित आरोपींना चोपडा येथे आणून चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, मयत प्रदीप महाजन याचे आरोपी विजय वैदकर याच्याशी जुने वाद (पूर्ववैमनस्य) असल्याने संगनमताने हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. संशयित आरोपी चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची माहितीही समोर आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोउनि सोपान गोरे, पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ रवींद्र पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिन्हाडे, सुनील दामोदरे, पोकॉ रावसाहेब पाटील, चापोहेकॉ रिजवान शेख तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. पवन देसले, पोउनि चेतन परदेशी यांचा समावेश होता. अवघ्या २४ तासांत आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon