मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. काही महिन्यांआधी सुशांत सिंह राजपूतनं त्याच्या 50 स्वप्नांच्या लिस्टबद्दल सांगितलं होतं जी आयुष्यात त्याला पूर्ण करायची होती. आपल्या पर्सनल डायरीतील या स्वप्नांची लिस्ट सुशांतनं सोशल मीडियावरदेखील शेअर केली होती. 14 सप्टेंबर 2019 साली ही लिस्ट शेअर करताना त्यानं लिहिलं होतं, ‘My 50 Dreams & Counting.’ सुशांतच्या याच स्वप्नानंबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
सुशांत सिंह राजपूत की पर्सनल डायरी- सामने आई उनके 50 सपनों की लंबी लिस्ट, जो अब अधूरे रह गए#SushantSinghRajput #SushantNoMore
1) विमान उडवायला शिकणं.
2) आयर्न मॅन ट्रायथलोन (स्विमिंग, सायक्लिंग, रनिंग) ची तयारी करणं.
3) डाव्या हातानं क्रिकेट खेळणं.
4) कोड (टेलीकम्युनिकेशनची भाषा शिकणं.
5) स्पेसबद्दल शिकण्यात मुलांची मदत करणं.
6) टेनिस चॅम्पियनसोबत मॅच खेळणं.
7) चार टाळ्यांचे पुशअप्स मारणं.
8) एक आठवडा चंद्र, मंगळ, शुक्र आणि शनी ग्रहाला त्यांच्या कक्षेत फिरताना मॉनिटर करणं.
9) ब्लू होलमध्ये उडी घेणं.
10) डबल स्लिट एक्सपेरीमेंट करून पाहणं.
11) 1000 झाडं लावणं
12) दिल्ली कॉलेजच्या होस्टेलवर एक सायंकाळ घालवणं.
13) मुलांना इस्रो किंवा नासामध्ये वर्कशॉपसाठी पाठवणं.
14) कैलास पर्वतावर ध्यानस्त बसणं.
15) चॅम्पियनसोबत पोकर खेळणं.
16) पुस्तक लिहणं.
17) सर्नची लॅब बघायला जाणं.
18) धुवीय प्रकाश पाहून पेंट करणं.
19) नासाचं एक वर्कशॉप अटेंड करणं.
20) सहा महिन्यात सिक्स पॅक अॅब्ज बनवणं.
21) सेनोटेसमध्ये पोहणं.
22) जे लोक पाहून शकत नाही त्यांना कोडिंग शिकवं.
23) जंगलात एक आठवडा काढणं.
24) वैदिक ज्योतिष समजून घेणं.
25) डिज्नीलँडला जाणं.
26) लीगोची लॅब पाहणं.
27) एका घोडा पाळणं.
28) 10 प्रकारचा डान्स शिकणं.
29) फ्री शिक्षणासाठी काम करणं.
30) एका विशाल टेलीस्कोपमधून अँड्रोमेडे गॅलेक्सी पाहणं आणि त्याचा अभ्यास करणं.
31) योगा शिकणं.
32) अंटार्क्टीकाला फिरायला जाणं.
33) महिलांच्या सुरक्षेसाठीच्या ट्रेनिंगसाठी मदत करणं.
34) एका सक्रिय ज्वालामुखीची फोटोग्राफी
35) शेती करणं
36) लॅम्बोर्गिनी खरेदी करणं.
37) मुलांना डान्स शिकवणं
38) दोन्ही हातांनी समान तीरंदाजी करणं.
39) रेसनिक-हेलिडेच्याा भौतिकशास्त्राच्या पुस्तकाचं पूर्ण वाचन करणं.
40) पॉलेनेसियन अॅस्ट्रोनॉमी समजून घेणं.
41) 50 गाण्यांवर गिटार वाजवायला शिकणं.
42) चॅम्पियनसोबत बुद्धिबळ खेळणं.
43) वियनाच्या सेंट स्टिफन कॅथेड्रेलला जाणं.
44) व्हिजीबल साऊंड आणि व्हायब्रेशनचा प्रयोग करणं.
45) इंडियन डिफेंस फोर्सेजसाठी मुलांना तयार करणं.
46) स्वामी विवेकानंदांवर एक डॉक्युमेंट्री तयार करणं.
47) सर्फ बोर्डच्या मदतीनं लाटांवर खेळणं.
48) आर्टीफिशियल इंटेलिजेंसवर काम करणं.
49) ब्राझीलचा डान्स आणि मार्शल आर्ट शिकणं.
50) ट्रेनमध्ये बसून पूर्ण युरोप फिरणं.