मुंबई (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोना विळखा घट्ट होत चालला आहे. अशात दिल्लीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे इनकम टॅक्सच्या अतिरिक्त कर संचालकांनी स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण आयकर विभागाला धक्का बसला आहे.
शिवराज सिंह (वय 56) असे आत्महत्या करणार्या कर संचालकांचे नाव आहे.कोरोनाच्या भीतीमुळे त्यांनी दिल्लीमध्ये द्वारका सेक्टर 6 मध्ये राहत्या घरी स्व:ला गोळी मारुन आत्महत्या केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आत्हमत्या करण्याआधी त्यांनी एक सुसाईड नोटदेखील लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं धक्कादायक कारण लिहिले आहे.
कोरोना झाल्याची शंका असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साडेसहा वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.