जळगाव (प्रतिनिधी) :- आकाशवाणी चौकात रूग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधेचे महादेव हॉस्पीटल सूरू झाले असून मुबंई पुण्याच्या धर्तीवर सेवा देण्यासाठी न्यूरोलॉजी विभागात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक निदान यंत्रणांची सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्णांना अचूक, जलद व विश्वासार्ह तपासणी मिळावी यासाठी ईएमजी, एनसीएस,ईईजी,बेरा आणि व्हीईपी या सर्व सुविधा आता पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यात आलेल्या आहेत.
नसा व स्नायूंच्या विकारांचे अचूक निदान करणारी इएमजी व एनसीएस ही न्युरोपथी, रॅडिक्युलोपथी, मायोपथी इत्यादी आजारांच्या तपासणीसाठी उपयुक्त ठरत आहे. अपस्मार, झटके व मेंदूतील असामान्य विद्युत क्रियांचे मूल्यांकन करण्यासाठी ईईजी म्हणजेच इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते.श्रवण मार्गातील कार्यक्षमता तपासण्यासाठी विशेषतः बालरुग्ण व श्रवणदोष असलेल्या रुग्णांना उपयुक्त अशी बेरा- (ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री) तसेच दृष्टी मार्गातील तांत्रिक अडचणी व मेंदू ते डोळा यातील कार्यातील दोष ओळखण्यासाठीव्हीईपी (व्हिज्युअल इव्होक्ड पोटेंशियल) तपासणी अत्यंत अचूक व सुरक्षित मानली जाते. या सर्व तपासण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता आजारांचे लवकर निदान, अचूक रिपोर्टिंग तसेच योग्य व प्रभावी उपचारांना मोठी मदत मिळणार आहे.या चाचण्या अत्यल्प दरातच केल्या जात असून जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी महादेव हॉस्पीटलच्या न्यूरोलॉजी विभागातील समन्वयक डॉ. हितेश मोरे ८८३०८८०१९३ डॉ. आशिक शेख ८९७६० ०६९७ यांच्याशी संपर्क करावा.