• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगाव तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त यादीत समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भडगाव तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त यादीत समावेश

आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

भडगाव (प्रतिनिधी):  शासनाने अतिवृष्टीने बाधित तालुक्यांसाठी जाहीर केलेल्या सुधारित यादीमध्ये अखेर भडगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून, आता भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नवीन निकषांनुसार नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कापूस, मका, केळी, सोयाबीन अशा प्रमुख पिकांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. या पार्श्वभूमीवर, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन भडगाव तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली होती.

मात्र, ९ ऑक्टोबर रोजी शासनाने जाहीर केलेल्या यादीतून भडगाव तालुक्याचे नाव वगळण्यात आले होते, त्यामुळे विरोधकांनी आमदारांवर टीका करण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात येताच, आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांशी संपर्क साधून भडगाव तालुक्यावर होत असलेला अन्याय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते की, कोणत्याही परिस्थितीत भडगाव तालुक्याचा यादीत समावेश करून घेईन, अन्यथा आंदोलन करण्याची वेळ आल्यास तेही करू. त्यांनी २४ तासांत मंत्रालयात पाठपुरावा केला.

मुख्य सचिवांच्या संपर्कात राहून त्यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन, काल रात्री उशिरा शासनाने सुधारित जीआर (सरकारी निर्णय) काढून त्यात भडगाव तालुक्याचा समावेश केला. या निर्णयामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होण्यास मदत होणार आहे, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या कामामुळे ‘आप्पा है तो मुमकिन है!’ यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, शेतकरी वर्गाकडून त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.


 

 

Tags: bhadgav-taluka-ativrushtigrast
Previous Post

ट्रकच्या धडकेने जबर धडकेत दुचाकीस्वार ठार, तरुण गंभीर !

Next Post

“जागतिक दृष्टी दिना”निमित्त जनजागृती रॅलीने वेधले लक्ष, विद्यार्थ्यांनी दिले संदेश !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“जागतिक दृष्टी दिना”निमित्त जनजागृती रॅलीने वेधले लक्ष, विद्यार्थ्यांनी दिले संदेश !

"जागतिक दृष्टी दिना"निमित्त जनजागृती रॅलीने वेधले लक्ष, विद्यार्थ्यांनी दिले संदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon