एरंडोल तालुक्यात कासोदा मार्गावर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात घडला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची भडगावहून कासोदा मार्गे एरंडोल जाणारी बस (एमएच २० बीएल ३४०२) क्रमांकाची नाल्यात पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत एका वृद्ध प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेबद्दल एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.
गुलाब तुळशीराम माळी (वय ६५, रा. सतीचे वडगाव ता. भडगाव) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, मुलगी यांचेसह राहत होते. खाजगी ठिकाणी पहारेकरी म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)काही कामानिमित्त ते एरंडोलकडे बसने निघाले होते. बस अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने बस नाल्यातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने एरंडोल येथील शासकीय रुग्णालय व जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याव्यतिरिक्त, ३५ किरकोळ जखमींवर एरंडोल येथेच प्राथमिक उपचार सुरू आहेत.(केसीएन)जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एरंडोल-कासोदा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एरंडोल पोलीस पुढील तपास करत आहेत.
जखमींची नावे
नौशादबी ऐरोज शेख (वय ५०), शमशाद मिर्झा (वय ६०), वैशाली धनश्री मराठे (वय २६,सर्व रा. भडगाव) फरीदबी शेख जबीर कुरेशी (वय ५०), शाहिनबी शेख फिरोज कुरेशी (वय ३५), मुसीरखान समशेर खान (वय ७५), शुभम राजेंद्र पाटील (वय २४), हुसेनबी मोशीरखान (वय ६८), गोविंदा चुडामन सोनवणे (वय ३४), पुरुषोत्तम तुकाराम महाजन (वय २०), आलीयाबी सलीम मणियार (वय १७ सर्व रा. कासोदा ता. एरंडोल), जिजाबाई आनंदा जाधव (वय ६५),(केसीएन),दगुबाई आप्पाजी जाधव (वय ६०), जिजाबाई विठ्ठल पाटील (वय ५५), कोमलबाई भिमराव पाटील (वय ७०), सुरेखा राजेंद्र जाधव (वय ३५, सर्व रा. सावरगाव), गंगाबाई एन. चौधरी (वय ५५, रा. धरणगाव) अनुसयाबाई दत्तू बडगुजर (वय ६५, रा. पिंपळखेडा), रत्नाबाई रतिलाल धनगर (वय ५०, रा. चांदसणी), लताबाई शांताराम पाटील (वय ६०), शांताबाई रामदास पाटील (वय ६५), शांताराम रामदास पाटील (वय ६५), अहिल्या दशरथ पाटील (वय ६५), अनिता समाधान पाटील (वय २०), दिपाली दिलीप पाटील (वय ४०, सर्व रा. आडगाव ता. एरंडोल), नेहरू बाबुलाल पाटील (वय ५५, रा. भोलगाव), सखुबाई विलास गोसावी (वय ५० रा. भातखेडा), अमोल आबासाहेब पाटील (वय २५ रा. पासर्डी, ता. भडगाव), उन्नती धनसिंग पाटील (वय १७) मनोज महादू पाटील (वय १८), उषाबाई रमेश पाटील (वय ५५), शोभाबाई रमेश पाटील (वय ५५), मनीषा सोमसिंग पाटील (वय १८), रोशनी प्रवीण पाटील (वय १८, सर्व रा. खडकी ता. एरंडोल), आनंदा महादू पाटील (वय ६५, रा. निपाणी ता. एरंडोल),(केसीएन)काळुबाई धनसिंग पाटील (वय ६२, विरावली ता. यावल), मेहमूद मनियार (वय १७, रा. बोरनार), सुभाष विठ्ठल पाटील (वय ६५, रा. पाचोरा), अनिता समाधान पाटील (वय २५), समाधान कैलास पाटील (वय ३५), उत्कर्ष समाधान पाटील (वय साडेचार वर्ष, सर्व रा. वडगाव बुद्रुक ता. भडगाव), ऋषिकेश शरद पाटील (वय १७, रा. एरंडोल), वैशाली ज्ञानेश्वर मराठे (वय २६, रा. भडगाव) विद्या पंडित पाटील (वय १८), तुळजाबाई रामदास पाटील (वय ५५, रा. खडकी ता. एरंडोल) यांच्यासह कल्पना पाटील, निर्मलाबाई सोनवणे (वय ६५, रा. भडगाव) हे जखमी झाले आहेत.