पाटील विद्यालयात २९८ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
शिरसोली (वार्ताहर) :येथील हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय, आप्पासाहेब जगतराव बारकू पाटील उच्च माध्यमिक विद्यालय आणि देवेंद्र प्रमोद पाटील प्राथमिक विद्यामंदिर शिरसोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवारी (आंतरराष्ट्रीय योग दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तिन्ही विद्यालयांतून एकूण २९८ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन योगसाधना केली.
या योग शिबिरात माध्यमिक विद्यालयाचे सुमारे १८८ विद्यार्थी व विद्यार्थिनी, आप्पासाहेब जगतराव बारकू पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील ३५ विद्यार्थी व विद्यार्थिनी, तर देवेंद्र प्रमोद पाटील प्राथमिक विद्यामंदिर शिरसोली येथील ७५ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एस. के. पांडे यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या कवायती व आसने करून घेतली. योग साधनेमध्ये शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने योगसाधना केली, ज्यामुळे त्यांना योगाचे शारीरिक व मानसिक फायदे स्पष्ट झाले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील तसेच तिन्ही विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उत्साही सहभागाचे कौतुक केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. हा संयुक्त योग दिन कार्यक्रम विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि शरीर निरोगी व संतुलित राहण्यासाठी प्रेरित करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल ठरले, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.