जळगाव ( प्रतिनिधी ) – येथे राष्ट्रीय सेवा योजनेर्तंगत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीम च्या अंतर्गत योग दिवस साजरा करण्यात आला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत जळगाव येथिल डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.गौरव ढोले आणि प्रा. एन. डी. पाटील यांनी योग अभ्यासाचे आयोजन केले.क्रीडा शिक्षक आणि योग अभ्यासक प्रा. आर. डी चौधरी यांनी योगासने आणि प्राणायाम याचे प्रात्यक्षिक करून या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रवीण देवरे, प्रा. एस एन पाटील, प्रा. बी एम गोणशेटवाड, प्रा. अमोल सोहानी, प्रा. करण बनसोडे, प्रा.कार्तिक खर्चे, प्रा. सागर ठाकरे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली. शासनाच्या प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधील शाळा तसेच सामाजिक स्थळांना भेटी देत योग दिनाचे महत्व सांगतले.